Skip to content
Home » श्री क्षेत्र लेण्याद्री येथे गणेश जयंती उत्सव

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे गणेश जयंती उत्सव

  • by

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अष्टविनायक गणपती देवस्थानांपैकी जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे दि. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी माघी गणेश जयंती उत्सव साध्या व पारंपारीक पद्धतीने संपन्न झाला. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दरवर्षी गणेश जयंती निमित्त लेण्याद्री येथे भव्य स्वरुपात यात्रा भरते. परंतु कोरोणा आजाराचे संकटामुळे यावर्षी यात्रेचे आकर्षण असलेले बैलगाडा शर्यत व यात्रा न भरल्याने गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली. दिवसभरात भाविकांनी शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करत श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतला.
दरवर्षी गणेश जयंतीनिमित्ताने देवस्थानचे वतीने होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह साध्या पध्दतीने संपन्न झाला. पहाटे ५.०० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कैलास लोखंडे व उपाध्यक्ष संजय ढेकणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक,महापुजा व आरती करण्यात आली. त्यानंतर भाविक भक्तांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतला. दुपारी १२:०० वाजता मंदिरात भजन करुन गणेश जन्माचा उत्साव पारंपारीक पध्दतीने करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्रशेठ शेटे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, सदाशिव ताम्हाणे, विजय वर्‍हाडी, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक भक्त उपस्थित होते. देवस्थानचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. यावेळी छाया व सतीश विठ्ठ्ल बेळे या बहिण भावांचे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सी आर पी एफ व आसाम रायफल्स मध्ये खडतर परिश्रम करीत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत निवड झाल्याबद्द्ल देवस्थानचे वतीने रक्कम रु.१०,०००/- व लेण्याद्री ग्रामविकास मंडळ मुंबई, गोळेगावचे वतीने रक्कम रु.१०,०००/- प्रोत्साहन म्हणुन देण्यात आली. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. देवस्थानचे वतीने दर्शनमार्गावर सॅनीटायझर स्टॅन्ड उभारण्यात आले होते. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.