कोरोनाच्या वाढत्या प्राद्रर्भावामुळे संकष्टी चतुर्थीस श्री क्षेत्र लेण्याद्री बंद.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान (ता. जुन्नर) भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता त्यानुसार देवस्थान बंद ठेवण्यात आले होते. संकष्टी चतुर्थीस श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाकरीता भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्या अनुषंगाने सध्या वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या आदेशान्वये मंदिर बंद ठेवण्यात आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिर बंद असल्याने येणार्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली. भाविकांकरीता फेसबुकच्या माध्यमातुन ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.