Skip to content
Home » लेण्याद्री कोविड सेंटर, कोविंड रुग्णांसाठी संजीवनी

लेण्याद्री कोविड सेंटर, कोविंड रुग्णांसाठी संजीवनी

  • by

अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेले श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव येथील कोविड सेंटर कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे.
कोरोना सारख्या महामारी ने संपूर्ण जगात थैमान घातले आणि एका विषाणूने लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले. याच संकट काळात दिनांक २२/०५/२०२० रोजी श्री लेण्याद्री गणपती देवस्थान चे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले यात्रीनिवास ज्यामध्ये पंचवीस हजार चौरस फुटाचा सभामंडप, ६४ रूम व इतर दोन छोटे हॉल हे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने सर्वप्रथम शासनास विनामोबदला उपलब्ध करून दिले.
श्री लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाच्या पायथ्याशी असलेल्या कोविड सेंटर मध्ये आज तागायत २२/०५/२०२० ते १८/०४/२०२१ पर्यंत ४७५३ रुग्णांची नोंद झाली पैकी ४८६ रुग्ण पुढील उपचारासाठी शहरात पाठवण्यात आले ,११२८ रुग्ण घरी बरे झाले तर २६८८ रुग्ण लेण्याद्री कोविड सेंटर मधून बरे होऊन सुखरूप घरी गेले. ते केवळ गिरीजात्मकाचा आशीर्वाद आणि त्या ठिकाणी असलेले वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व आरोग्य सेवकांमुळेच.
लेण्याद्री कोविड सेंटरमध्ये एका वेळेस ३५० रुग्ण राहू शकतील एवढी व्यवस्था केलेली आहे. कुठल्याही पेशंट कडून एकही रुपया न घेता या ठिकाणी ऍडमिट केले जाते , औषधे दिली जातात, ऑक्सीजन, पल्स, तापमान,शुगर दिवसातून तीन वेळा तपासले जाते. चहा, दूध, नाश्ता व दोन वेळेचे जेवण देखील दिले जाते.
या यात्रीनिवास भाग दोन मधून देवस्थानला मिळणाऱ्या उत्पन्नाची पर्वा न करता तसेच कोरोना संपल्यानंतर हे सेंटर बंद झाल्यावर या भक्त निवासासाठी सुमारे एक कोटी रुपये दुरुस्तीसाठी खर्च येणार आहे. या सर्वांची परवा न करता विश्वस्त मंडळाने सामाजिक जाणिवेतून ही इमारत शासनास दिली आहे.त्यामुळे सर्व विश्वस्त मंडळ व जे शासकीय अधिकारी या कोविड सेंटरचे व्यवस्थापन व नियोजन करत आहेत त्यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन, जुन्नर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पदाधिकारी या सर्वांचे खूप खूप धन्यवाद व आभार..!
अध्यक्ष व विश्वस्त मंडळ,
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट,गोळेगाव.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻