Skip to content
Home » श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे श्री गिरीजात्मज गणपतीला फुलांची आकर्षक आरास.

श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे श्री गिरीजात्मज गणपतीला फुलांची आकर्षक आरास.

  • by

श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे श्री गिरीजात्मज गणपतीला फुलांची आकर्षक आरास.
शुक्रवार दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी देवस्थानचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, खजिनदार काशिनाथ लोखंडे उपस्थित होते. चतुर्थीनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर नागरिकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी चतुर्थीनिमित्त श्री गिरीजात्मजास साकडे घालण्यात आले. कोरोनाच्या आजारामुळे व लॉकडाउन निर्बंध चालू असल्याने मंदिर बंद आहे. परंतु भारतीत पुरातत्व विभागाने पर्यटकांकरीता दि.१८ सप्टेंबर २०२१ पासुन लेण्या खुल्या केल्याने येणार्‍या भाविकांना मंदिराबाहेरुन श्री गिरीजात्मज गणपतीचे दर्शन होत आहे. दिवसभरात अहमदनगर, नाशिक, ठाणे व इतर ठिकाणांवरुन अनेक भाविकांनी श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे येवुन श्रींचे मुख-दर्शन घेतले. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.