मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्यावतीने पहाटे ५ वाजता देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, विश्वस्त सदाशिव ताम्हाणे व जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. मंदिरे व धार्मिक स्थळे खुली झाल्यानंतर प्रथमच अंगारकी चतुर्थी असल्यामुळे दिवसभर भाविकांची गर्दी होती. दिवसभरात सुमारे १२ ते १५ हजार भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
अंगारकी चतुर्थीनिमित्त पहाटे ५ वाजता श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्यावतीने देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, विश्वस्त सदाशिव ताम्हाणे व जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, प्रभाकर गडदे, गोळेगाव ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते. श्री गिरीजात्मज गणेशाच्या मुर्तीस व मंदिरात आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली होती. राज्य शासनाने मंदिरे व धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी दिली असली तरी कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय योजना देवस्थान मार्फत करण्यात आली होती. दिवसभरात अहमदनगर, नाशिक, ठाणे व इतर ठिकाणावरून अनेक भाविकांनी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे येऊन श्रींचे दर्शन घेतले. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.