Skip to content
Home » लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी सदाशिव ताम्हाणे

लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी सदाशिव ताम्हाणे

  • by
Sadashiv Tamhane as the Chairman of Lenyadri Devasthan Trust

अष्टविनायक गणपतीपैकी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी सदाशिव शंकर ताम्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे मावळते अध्यक्ष कैलास लोखंडे यांनी दिली.
सदाशिव ताम्हाणे यांनी यापूर्वी देवस्थानच्या खजिनदार पदावर काम केले असून सध्या ते विश्वस्त पदावर कार्यरत होते. रविवारी दिनांक ०५/१२/२०२१ रोजी झालेल्या सभेत त्यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा सत्कार देवस्थान ट्रस्ट मार्फत करण्यात आला. यावेळी देवस्थानचे मावळते अध्यक्ष कैलास लोखंडे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, विश्वस्त शंकर ताम्हाणे, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, विजय वऱ्हाडी, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, भगवान हांडे आणि कार्यालय सचिव रोहिदास बिडवई हे उपस्थित होते. निवडीनंतर देवस्थानच्या आणि येथील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सर्वाना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देवस्थान ट्रस्ट मार्फत गणेशभक्तांसाठी व पर्यटकांसाठी आधुनिक सोयी सुविधा पुरवणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे यांनी सांगितले.