बुधवार दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्यावतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, विश्वस्त जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. दिवसभरात सुमारे ७ ते ८ हजार भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
संकष्टी चतुर्थीनिमित्त पहाटे ५.३० वाजता श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्यावतीने देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, विश्वस्त जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, भगवान हांडे, गोळेगाव ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते. श्री गिरीजात्मज गणेशाच्या मुर्तीस व मंदिरात आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली होती. दिवसभरात अहमदनगर, नाशिक, ठाणे व इतर ठिकाणावरून अनेक भाविकांनी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे येऊन श्रींचे दर्शन घेतले. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.