Skip to content
Home » संकष्टी चतुर्थीनिमीत्त श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे श्री गिरीजात्मज गणपतीस फुलांची आकर्षक आरास

संकष्टी चतुर्थीनिमीत्त श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे श्री गिरीजात्मज गणपतीस फुलांची आकर्षक आरास

  • by

शुक्रवार दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्यावतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
संकष्टी चतुर्थीनिमित्त पहाटे ५.३० वाजता श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्यावतीने देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. श्री गिरीजात्मज गणेशाच्या मुर्तीस व मंदिरात आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली होती. कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पर्यटन स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याने भारतीत पुरातत्व विभागाने पर्यटकांकरीता दि.१० जानेवारी २०२२ पासुन लेण्या बंद केल्याने मंदिर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांची अष्टविनायक यात्रा पुर्ण होत नसुन भाविक नाराजगी व्यक्त करत आहेत. देवस्थान ट्रस्टने पायथ्याशी दर्शन व्यवस्था केलेली आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी चतुर्थीनिमित्त श्री गिरीजात्मजास साकडे घालण्यात आले. दिवसभरात अहमदनगर, नाशिक, ठाणे व इतर ठिकाणावरून अनेक भाविकांनी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे येऊन पहील्या पायरी जवळ श्रींचे दर्शन घेतले. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.