Skip to content
Home » श्री गणेश जयंतीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे विविध धार्मिक कार्यक्रम

श्री गणेश जयंतीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे विविध धार्मिक कार्यक्रम

  • by

श्री गणेश जयंतीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे विविध धार्मिक कार्यक्र
अष्टविनायकापैकी एक गणपती असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री येथे माघी श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली. श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त शनिवार दि.२९ जानेवारी ते शनिवार दि.५ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. शुक्रवार दि.४ रोजी श्री गणेश जयंतीनिमित्त पहाटे विधिवत अभिषेक पूजा होणार असून त्यानंतर भाविकाकरिता दर्शनासाठीमंदिर खुले होणार आहे. सकाळी १० ते १२ या दरम्यान मंदिरात ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे किर्तन होणार असून श्री गणेश जन्म सोहळा पारंपारिक पद्धतीने होणार आहे व नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तसेच शनिवार दि.५ रोजी ह.भ.प. गणेश महाराज शिंदे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.