Skip to content
Home » अंगारकी चतुर्थी दि. १९ एप्रिल २०२२

अंगारकी चतुर्थी दि. १९ एप्रिल २०२२

  • by

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची गर्दी
या वर्षातील पहिली तसेच कोविड निर्बंध शिथील झाल्यानंतर प्रथमच अंगारकी चतुर्थी आल्याने मंगळवार दि. १९ एप्रिल २०२२ रोजी श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मज गणपतीचे दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासुन गर्दी होती. दिवसभरात हजारो भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ४.०० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई व विश्वस्त कैलास लोखंडे, जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी श्रींचे दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी देवस्थानचे खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, नंदकुमार बिडवई, भगवान हांडे व ग्रामस्थ उपस्थित होते. अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची व सफेद द्राक्षांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दुपारी १२:०० वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. देवस्थानच्या वतीने व आधार ब्लड सेंटर, संगमनेर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भाविक रक्तदात्यांनी रक्तदान केले. सजावटी करीता नारायणगाव येथील व्यापारी रोहिदास घोलप यांनी द्राक्ष उपलब्ध करून दिली तसेच दिवसभर येणाऱ्या भाविकांकरीता गोळेगाव येथील रवींद्रशेठ माळी यांच्या वतीने खिचडी महाप्रसादाचे वाटप केले. स्वकाम सेवा मंडळ आळंदी यांचे १९ सदस्यांनी लेण्याद्री परिसरातील साफसफाई करून आपली सेवा दिली. सायंकाळी मुक्ताई भजनी मंडळ शिवेची वाडी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर पिंपळगाव जोगा येथील सागर बाळकृष्ण हांडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा भाविकांनी लाभ घेतला. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.