Skip to content
Home » शनिवार दि. १६ जुलै २०२२ रोजी संकष्टी चतुर्थी

शनिवार दि. १६ जुलै २०२२ रोजी संकष्टी चतुर्थी

  • by

 

*संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे फुलांची आकर्षक सजावट*
शनिवार दि. १६ जुलै २०२२ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मज गणपतीस आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त प्रभाकर गडदे व जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, भगवान हांडे व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दुपारी १२:०० वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. अतिवृष्टीमुळे कलम १४४ लागू असल्याने भाविकांची संख्या नेहमीपेक्षा कमी होती. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ शिवेचीवाडी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर पिंपरी चिंचवड मतदार संघाचे आमदार श्री लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा भाविकांनी लाभ घेतला. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.