Skip to content
Home » सोमवार दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी संकष्टी चतुर्थी

सोमवार दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी संकष्टी चतुर्थी

  • by


*संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांचा महापूर*
सोमवार दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मज गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. सलग चार दिवस शासकीय सुट्ट्या तसेच १५ ऑगस्ट, तिसरा श्रावणी सोमवार व संकष्टी चतुर्थी एकत्र असल्याने दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
पहाटे ५.३० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई व विश्वस्त जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी देवस्थानचे खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, भगवान हांडे, देवस्थानचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची तिरंगा थीम मध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवस्थाने लेण्याद्री परिसरामध्ये व भक्तनिवास इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. दरवर्षी देवस्थानच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी गोळेगाव येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो, तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात येते . देवस्थानचे भक्तनिवास इमारतीच्या प्रांगणात देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त गोविंद मेहेर व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका पल्लवीताई डोके यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १५ ऑगस्ट, तिसरा श्रावणी सोमवार व संकष्टी चतुर्थी तसेच सलग चार दिवस शासकीय सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची दिवसभर गर्दी होती. श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दुपारी १२:०० वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले .तसेच भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ शिवेचीवाडी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.