*श्री क्षेत्र लेण्याद्री येथे आरोग्य शिबिराचे आयोजन*
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, ॲकॉर्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मोशी व डिसेंट फाउंडेशन जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. २३ रोजी श्री क्षेत्र लेण्याद्री येथील यात्रीनिवास भाग नं.१ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली. या शिबिरात हृदयरोग, मेंदुरोग , हाडांचे विकार , मुत्ररोग , जनरल सर्जरी , क्षयरोग , जनरल मेडीसीन , श्वसन विकार तसेच ECG व रक्तातील शुगर , संपूर्ण रक्तसंख्या ( CBC ) इत्यादी तपासण्या करण्यात आल्या तसेच रुग्णांना विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात एकूण ८४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात रुग्णांची शुगर बीपी तसेच रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या १९ रुग्णांची ईसीजी तपासणी करण्यात आली. या शिबिरात आयुष्यमान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड ५४ रुग्णांना काढून देण्यात आले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, भगवान हांडे, गणपत आधान , गणेश मोधे , ॲकॉर्ड हॉस्पिटलचे नंदकुमार गणेशकर,डॉ. प्रियंका काकडे, अजय काकडे, मनीषा दडस, रूपाली गुरचळ आदी डॉक्टर टीम, हिंदलॅबचे मंगेश साळवे नम्रता साळवे, चैत्राली शेळके, आशा सेविका छाया ढेकणे , योगिता काळे व गोळेगाव ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिराचा गोळेगाव व पंचक्रोशीतील रुग्णांनी लाभ घेतला. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.