Skip to content
Home » गुरुवार दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी संकष्टी चतुर्थी

गुरुवार दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी संकष्टी चतुर्थी

  • by

 

संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची गर्दी.
गुरुवार दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मज गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, खजिनदार काशिनाथ लोखंडे व विश्वस्त जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, भगवान हांडे, देवस्थानचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरात सकाळी ६ वाजता, दुपारी १२:०० वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. तसेच भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ शिवेचीवाडी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर ओतुर येथील स्नेहल राहुल डुंबरे व अमेरीका येथील प्रफुल्ला भिमाशंकर या भाविकांचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.