Skip to content
Home » भव्य रक्तदान शिबिर

भव्य रक्तदान शिबिर

  • by

*श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन*

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव व आधार रक्तपेढी संगमनेर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २४ व २५ रोजी श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट यात्री निवास भाग- १ येथे दोन दिवशीय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असते. सध्याच्या परिस्थितीत गरजू रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताची मागणी व उपलब्ध असलेला रक्त साठा लक्षात घेता रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने शनिवार दिनांक २४ व रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार व रविवार तसेच नाताळच्या सलग सुट्ट्या असल्याने श्री क्षेत्र लेण्याद्री येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आले होते. देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना विविध सेवा सुविधा पुरविण्यात आल्या.
दिनांक २४/१२/२२ रोजी सकाळी ९:०० वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रथम रक्तदाता ऋषभ तुकाराम बिडवई यांचे शुभहस्ते करण्यात आले .
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई , उपाध्यक्ष संजय ढेकणे , खजिनदार काशिनाथ लोखंडे , विश्वस्त प्रभाकर जाधव , गोविंद मेहेर , प्रभाकर गडदे, मच्छिंद्र शेटे, जयवंत डोके तसेच आधार रक्तपेढीचे प्रमुख प्रदीप जाधव , प्रयोगशाळा तज्ञ ज्ञानेश्वरी येमले व कर्मचारी उपस्थित होते.
दोन दिवसात देवस्थान परिसरातील
दुकानदार , देवस्थानचे कर्मचारी , ग्रामस्थ व भाविक मिळून १२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकरराव ताम्हाणे यांनी दिले.