*प्लास्टिक मुक्त तीर्थक्षेत्र अभियानाचा जुन्नर येथे शुभारंभ*
बुधवार दिनांक ४ जानेवारी रोजी तहसील कार्यालय जुन्नर या ठिकाणी.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव, जुन्नर नगरपरिषद जुन्नर , रुद्रा ब्लु प्लॅनेट इन्व्हाँयर्नमेंटल सोल्युशन इंडिया लिमिटेड व केशव सीता मेमोरियल फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्लास्टिक मुक्त तीर्थक्षेत्र अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
लेण्याद्री सारख्या अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी असंख्य भाविक व पर्यटक येत असतात या ठिकाणच्या प्लास्टिकचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करून पुण्यातील प्लास्टिक विघटन करणारी रुद्रा ब्ल्यू प्लॅनेट इन्व्हाँयर्नमेंटल इंडिया लिमिटेड व केशव सीता मेमोरियल फाउंडेशन ट्रस्ट या संस्थांना हे प्लास्टिक दिले जाणार असून त्यापासून इंधन तसेच रस्ते बनवण्यासाठी त्याचा वापर होणार आहे.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी महसूल संजय तेली, उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, तहसीलदार रवींद्र सबणीस, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी ,जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे , आरोग्य अधिकारी प्रशांत खत्री श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई , उपाध्यक्ष संजय ढेकणे, सचिव शंकर ताम्हाणे , खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त जयवंत डोके, भगवान हांडे, आदी मान्यवर उपस्थित होते.