दि. २२ जानेवारी रोजी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव, डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव, डोके हॉस्पिटल नारायणगाव, ॲकॉर्ड हॉस्पिटल मोशी, विघ्नहर्ता हॉस्पिटल नारायणगाव, लोकमान्य कॅन्सर हॉस्पिटल चिंचवड पुणे, युनिक हॉस्पिटल आळेफाटा, आरोग्य विभाग पंचायत समिती जुन्नर व ग्रामीण रुग्णालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ५१३ रुग्णांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांच्या हस्ते झाले. देवस्थान ट्रस्टचे वतीने सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल स्टाफ, नर्स व आशा सेविका यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अमेय डोके, डॉ. संदीप डोळे व डॉ. वर्षा गुंजाळ यांनी शिबिरास शुभेच्छा देत आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजनाथ काशिद, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकिय अधिकारी डॉ. अक्षय जाधव, ॲकॉर्ड हॉस्पिटलचे डॉ. पोतदार, डॉ. तृप्ती गायकवाड, डोके हॉस्पिटलचे डॉ. अमेय डोके, डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे डॉ.संदीप डोळे, युनिक हॉस्पिटलचे डॉ. सतीश डेरे, लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. मोहिनी बेंद्रे, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. आशुतोष बोलीज, डॉ. तेजस बोलीज, डॉ. प्रवीण काळे, डॉ. सोनार, महालॅबचे मंगेश साळवे, सहदेव गोळे, रोहित जगताप, देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, प्रभाकर गडदे, सदाशिव ताम्हाणे, जयवंत डोके, भगवान हांडे, गोळेगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. आलेल्या रुग्णांना नाष्टाची व्यवस्था केली होती. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, रक्ताची तपासणी, अस्थिरोग, मणक्याचे आजार, पोटाचे विकार, इसीजी व हृदयरोग, स्त्री रोग तपासणी, त्वचारोग, कर्करोग (कॅन्सर), स्तनाचा कॅन्सर, नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, बालरोग तपासणी, इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. शिबिरात आवश्यकतेनुसार रुग्नांना मोफत चष्मे वाटप व औषधे वाटप करण्यात आले. तसेच गरजु रुग्णांची मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबीरास विजय शिवराम ताम्हाणे व भाऊसाहेब सखाराम मेहेर यांच्यावतीने मोफत डोळ्याचे ड्रॉप देण्यात आले. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.