Skip to content
Home » माघी श्री गणेश जयंती उत्सव

माघी श्री गणेश जयंती उत्सव

  • by

*श्री क्षेत्र लेण्याद्री येथे गणेश जयंतीनिमित्त श्रींचा जन्मोत्सव उत्साहात*
बुधवार दि.२५ रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरीजात्मजाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासुन मोठी गर्दी होती. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मज गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते दिवसभर बैलगाडे चालु होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व उपाध्यक्ष संजय ढेकणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी देवस्थानचे सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, कैलास लोखंडे, विजय वऱ्हाडी, नंद्कुमार बिडवई, जयवंत डोके, भगवान हांडे, देवस्थानचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी १० ते १२ या दरम्यान मंदिरात ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे किर्तन झाले. श्री गणेश जन्म सोहळा पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात सकाळी ६ वाजता, दुपारी १२:०० वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. तसेच भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. गोळेगाव येथील राम मारुती कोकणे यांनी देवाचे नैवेद्याकरीता फळे दिली होती. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त गुरुवार दि.१९ जानेवारी ते गुरुवार दि.२६ जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. गुरुवार दि.२६ जानेवारी रोजी ह.भ.प. पारस महाराज मुथ्था यांचे काल्याचे किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.