*श्री क्षेत्र लेण्याद्री येथे स्वच्छता अभियान*
सोमवार दिनांक ९/१/२३ रोजी
अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान या ठिकाणी संत निरंकारी मिशन जुन्नर शाखा यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी दर्शन मार्ग, पायरी मार्ग, वाहनतळ, लेण्याद्री फाटा ते पायथा रस्त्याच्या दुतर्फा व लेण्याद्री परिसर या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
यावेळी ५७ गोणी प्लास्टिक कचरा व प्लास्टिक बॉटल सेवेकर्यांनी जमा केल्या. तसेच पाण्याच्या टाक्यांचा परिसर व स्वच्छतागृह परिसरात देखील स्वच्छता व साफसफाई करण्यात आली.
यावेळी श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट व भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
स्वच्छता अभियानाचा शुभारंभ श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई , संत निरंकारी मिशनचे सेक्टर संयोजक चंद्रकांत कुऱ्हाडे व जुन्नर शाखेचे प्रमुख लक्ष्मण दाते सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी सेवादल संचालक रामकृष्ण भागवत, सेवा दल शिक्षक निलेश फटांगडे, देवस्थानचे सचिव शंकर ताम्हाणे,खजिनदार काशिनाथ लोखंडे,विश्वस्त सदाशिव ताम्हाणे,जयवंत डोके,भगवान हांडे व सेवा दल बंधू भगिनी खाकी आणि निळ्या वर्दी मध्ये उपस्थित होते. संत निरंकारी सत्संग परिवारातील सदस्य देखील मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झाले होते.