श्री क्षेत्र लेण्याद्रीला “ती” ची महाआरती
बुधवार दि.०८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या हस्ते श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्रींची महाआरती करण्यात आली असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.
यावेळी पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ , परिचारिका व आशा सेविका तसेच शिरूर येथील निर्मला केसतोड , रेश्मा गायकवाड व महिला बचत गटाच्या असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर डॉ वर्षा गुंजाळ व सर्व महिलांच्या शुभहस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.