*श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थानला वॉटर कुलर भेट.*
रविवार दि.२३ एप्रिल रोजी अष्टविनायक गणपती देवस्थानांपैकी एक असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टला कॅनरा बँकेच्या वतीने शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याचा वॉटर कुलर व वॉटर प्युरीफायर भेट देण्यात आला तर गणेशभक्त उद्योजक श्री अण्णा मटाले यांच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी मेटल डिटेक्टर मशीन भेट देण्यात आले . वॉटर कुलर चे उद्घाटन कॅनरा बँकेचे व्यवस्थापक आदिनाथ धनवडे साहेब व लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांच्या हस्ते करण्यात आले तर मेटल डिटेक्टर चे उद्घाटन देवस्थानचे सेक्रेटरी शंकर ताम्हाणे व विश्वस्त मच्छिंद्र शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, प्रभाकर गडदे, भगवान हांडे, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई, कॅनरा बँकेचे व्यवस्थापक आदिनाथ धनवडे, बँक अधिकारी धनंजय जाधव, अथर्व फर्निचरचे मालक संजय वऱ्हाडी व भाविक उपस्थित होते. यावेळी देवस्थानच्यावतीने कॅनरा बँकेचे व्यवस्थापक व अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला व बँकेचे व श्री अण्णा मटाले यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिले.