Skip to content
Home » संकल्प स्वच्छ, सुंदर व सदाहरित श्री क्षेत्र लेण्याद्रीचा

संकल्प स्वच्छ, सुंदर व सदाहरित श्री क्षेत्र लेण्याद्रीचा

  • by

*संकल्प स्वच्छ, सुंदर व सदाहरित श्री क्षेत्र लेण्याद्रीचा*
सोमवार दिनांक ५ जून २०२३ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी एक असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री डोंगर सुशोभीकरण अभियानाचा शुभारंभ वृक्षारोपण करून करण्यात आला.
श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत आलेल्या भाविक व पर्यटकांना अनेक सोयी सुविधा पुरविल्या जातात तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवीले जातात. याच उपक्रमांतर्गत ‘श्री क्षेत्र लेण्याद्री डोंगर सुशोभिकरण अभियान’ राबविले जाणार असल्याची माहिती देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री क्षेत्र लेण्याद्री येथे असंख्य भावीक व पर्यटक श्रींचे दर्शनासाठी येत असतात. श्रींचे दर्शनाकरिता आलेल्या भाविकांना व पर्यटकांना साडेतीनशे पायऱ्या चढून जावे लागते. आलेल्या भाविकांचे व पर्यटकांचे दर्शन सुलभ व सुखकर व्हावे यासाठी देवस्थान ट्रस्ट तसेच भारतीय पुरातत्व विभाग प्रयत्न करत आहे. याकरिता श्री क्षेत्र लेण्याद्री डोंगर सुशोभीकरण अभियान राबविले जात असून यात श्री क्षेत्र लेण्याद्री डोंगराची स्वच्छता, सुंदरता वाढवीणेकरीता तसेच लेण्याद्रीचा डोंगर सदाहरीत करणेकरीता विविध उपक्रम राबवीले जाणार आहेत. याच अनुषंगाने सोमवार दिनांक ५ जून २०२३ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथील डोंगरावर वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. देवस्थानचे सचिव शंकर ताम्हाणे यांचे हस्ते विधीवत पुजाकरुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यानी आलेल्या मान्यवराचे स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाषणात सांगितले की, या अभियानांतर्गत श्री क्षेत्र लेण्याद्रीचे दर्शन मार्गावरील पायरी मार्गाच्या दुतर्फा फुलझाडांची लागवड करून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच लेण्याद्रीचे संपूर्ण डोंगरावर विविध फुलझाडे व फळझाडांची लागवड करण्यात येणार आहे. श्री गणपती बाप्पांचा आवडणाऱ्या २१ वनस्पतींचे ‘गणेशवन’ हा प्रकल्प देखील पर्यटन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी साकारणार आहे. तसेच वनविभागाच्या माध्यमातून भाविकांना विश्रांतीसाठी पॅगोडा, देवराई व भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सुलभ शौचालय, विश्रांतीसाठी बाकडे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वेटिंग शेड, दर्शन मार्गावर रेलिंग इत्यादी सुविधा करण्यात येणार आहे. तसेच लेण्याद्रीचा डोंगर वर्षभर सदाहरित दिसावा तसेच येथील नैसर्गीक सुंदरता वाढविणे यासाठी श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, भारतीय पुरातत्व विभाग, वनविभाग व विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ‘श्री क्षेत्र लेण्याद्री डोंगर सुशोभिकरण अभियान’ राबवीत आहोत. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यानी माहीती दिली. यानंतर २१ देशी वृक्षांची मान्यवराचे हस्ते लागवड करण्यात आली.
आलेल्या मान्यवरानी आपले भाषणात देवस्थानचे कौतुक करीत सदर उपक्रमास सहकार्याचे आश्वासन दिले. देवस्थानच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे माहीती जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांनी आपले भाषणात दिली. त्यानंतर देवस्थान ट्रस्टचे सचिव शंकर ताम्हाणे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करत सत्कार केले. यावेळी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, भूमी अभिलेख विभागातील गांगर्डे साहेब,रोटरी क्लब ऑफ नारायणगाव हायवे चे अध्यक्ष प्रा.डॉ. श्रीकांत फुलसुंदर, इतिहासाचे अभ्यासक प्रा.लहू गायकवाड, लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी चे अध्यक्ष संतोष रसाने, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे, स्वराज्य पर्यटन संस्थेचे अध्यक्ष विजय कोल्हे, भारतीय पुरातत्व विभागाचे गोकुळ दाभाडे, प्रा. मंडलिक सर, प्रा. आशिष मेहेर, देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष संजय ढेकणे,सचिव शंकर ताम्हाणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे विश्वस्त प्रभाकर जाधव,गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, जयवंत डोके, भगवान हांडे, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई,व्यवस्थापक निलेश सरजिने, देवस्थानचे कर्मचारी,भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.