Skip to content
Home » Friday 4th August 2023 Sankashti Chaturthi

शुक्रवार दि.०४ ऑगस्ट २०२३ संकष्टी चतुर्थी

  • by

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रींचे दर्शनाकरीता भाविकांची गर्दी.
शुक्रवार दि.०४ ऑगस्ट २०२३ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील ‘श्री गिरीजात्मज’ गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्ताने श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष संजय ढेकणे, विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, जयवंत डोके, भगवान हांडे, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई व कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गिरिजात्मज गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरात सकाळी ६ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. तसेच भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या. अधिक श्रावण मास व पावसामुळे भाविकांची व पर्यटकांची दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पावसामुळे लेण्याद्री डोंगर परीसर निसर्ग सौंर्द्याने बहरला असुन पावसाच्या रिमझीम सरींचा व धबधब्यांचा मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक मनसोक्त आनंद घेत आहेत. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ शिवेचीवाडी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर नवी मुंबई येथील गोपीनाथ विठ्ठल लोखंडे यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.