श्री क्षेत्र लेण्याद्री येथे देवाचे निर्माल्यापासून सुवासिक ( सुगंधी ) अगरबत्ती निर्मित्ती उपक्रमाचा शुभारंभ .
सोमवार दि.०६ नोव्हेंबर २०२३ रोजी अष्टविनायक गणपती तिर्थक्षेत्रापैकी एक असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री गिरीजात्मज गणपतीस अर्पण केलेल्या हार, दुर्वा, फुले या निर्माल्यापासून सुगंधी अगरबत्ती निर्मिती उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अशी माहीती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
अष्टविनायकापैकी एक असलेले व कोरीव लेण्याच्या सानिध्यात वसलेले श्री क्षेत्र लेण्याद्री येथे दिवसेंदिवस भाविकांचे व पर्यटकांचे संख्येत वाढ होत आहे. श्री क्षेत्र लेण्याद्री येथे येणार्या भाविकांना व पर्यटकांना श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टमार्फत विविध सेवा व सविधा पुरविल्या जातात. तसेच भाविकांच्या व पर्यटकांच्या सेवेसाठी देवस्थान ट्रस्टमार्फत नेहमीच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. यातुन श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट भाविकांची व समाजातील विविध घटकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. श्री क्षेत्र लेण्याद्री येथील मंदिरामध्ये श्री गिरीजात्मज गणपती चरणी भाविकांकडून अर्पण केले जाणारे हार, दुर्वा, फुले यांचे मोठया प्रमाणात निर्माल्य जमा होते. हे निर्माल्य कचर्यात न टाकता या निर्माल्याचे पावित्र्य जपण्याकरीता त्यावर प्रक्रिया करुन त्या पासून सुगंधीत अगरबत्ती बनविण्याचा संकल्प श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ यांनी केला. जेणे करुन भाविकांने वाहिलेल्या फुलांचा सुगंध या अगरबत्तीच्या माध्यमातुन सतत दरवळत राहील व अगरबत्तीचे विभूतीतुन भाविकांना श्री गिरीजात्मज गणेशाचा आशिर्वाद प्राप्त होईल. या सुगंधी अगरबत्ती निर्मिती रेफ्लो नॅचरल्स कंपनी यांच्या मार्फत केली जाणार आहे. या निर्माल्यापासून सुगंधी अगरबत्ती निर्मिती उपक्रमाचा शुभारंभ देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष संजय ढेकणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्थ गोविंद मेहेर, सदाशिव ताम्हाणे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, जयवंत डोके, भगवान हांडे, रेफ्लो नॅचरल्स कंपनीचे संस्थापक श्रीराम कुंटे, विजय जायभाये व गोळेगाव ग्रामस्थ यांच्या उपस्थित करण्यात आला. अशी माहीती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.