श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट्च्या अध्यक्षपदी श्री संजय ढेकणे यांची निवड.
अष्टविनायक गणपतीपैकी एक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री संजय रामदास ढेकणे यांचे निवड करण्यात आल्याची माहिती माजी अध्यक्ष श्री जितेंद्र बिडवई यांनी दिली.
संजय ढेकणे हे यापूर्वी देवस्थानच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या मासिक सभेत त्यांची अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. याप्रसंगी श्री संजय ढेकणे (अध्यक्ष), श्री गोविंद मेहेर (उपाध्यक्ष), श्री शंकर ताम्हाणे (सचिव) व श्री भगवान हांडे (खजिनदार) या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे माजी अध्यक्ष जितेंद्र बिडवई, माजी खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हणे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, कैलास लोखंडे, विजय वर्हाडी, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके आणि कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई उपस्थित होते. निवडीनंतर देवस्थान आणि येथील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सर्वानुमते काम करणार आहोत. तसेच श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट मार्फत गणेश भक्तांसाठी व पर्यटकांसाठी आधुनिक सोयीसुविधा पुरवणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री संजय ढेकणे यांनी सांगितले.