श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे प्रजासत्ताक दिन साजरा
शुक्रवार दिनांक २६ जानेवारी रोजी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. देवस्थानचे यात्रिनिवास भाग नं. २ येथे ध्वजावंदनाचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक आरस करण्यात आली होती. तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथील यात्रिनिवास भाग नं. २ येथे सकाळी ७.३० वाजता माजी सैनिक रामदास नामदेव मेहेर व सुभाष कृष्णाजी बिडवई यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ, देवस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री गिरीजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात तिरंगा रंगाची फुलांची आकर्षक आरस करण्यात आली होती तसेच मंदिर लेण्यांवर व यात्रिनिवास इमारतीवर आकर्षक नयनरम्य अशी तिरंगा रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.