Skip to content
Home » अखंड हरिनाम सप्ताह : चौथा दिवस

अखंड हरिनाम सप्ताह : चौथा दिवस

  • by

माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान येथे चालु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात शनिवार दि.10 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 07.00 ते 09.00 वाजेपर्यंत चौथ्या दिवसाची किर्तनसेवा ह.भ.प. जयश्रीताई तिकांडे यांची संपन्न झाली. त्यांनी श्री संत एकनाथ महाराज यांचे ‘संताचा उपकार । सांगावया नाही पार ॥’ या चार चरणाचे अभंगावर आपले सुंदर सुश्रव्य वाणीतून निरुपण केले. याचा सर्व भाविक भक्तांनी श्रवण लाभ घेतला.