Skip to content
Home » Grand Health Camp

भव्य महाआरोग्य शिबीर

  • by

माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव, आर झुणझूणवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल (मुंबई), डोके हॉस्पिटल नारायणगाव, श्री हॉस्पिटल आळेफाटा, आरोग्य विभाग पंचायत समिती जुन्नर व ग्रामीण रुग्णालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात नेत्र तपासणी, मोतीबिंदु शस्त्रक्रिया, हदयरोग तपासणी, इसीजी व मॅमोग्राफी तपासणी, बालरोग तपासणी, स्त्री रोग तपासणी, त्वचारोग तपासणी, मुत्ररोग तपासणी, कर्करोग तपासणी व रक्तातील विविध तपासण्या होणार आहेत. तसेच तंज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबीरात गरजुंना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून दिले जाणार आहेत. तरी गरजु रुग्णांनी या सुवर्ण संधीचा आवश्य लाभ घ्यावा, हि विनंती.