Skip to content
Home » श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन.

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन.

  • by

अष्टविनायक गणपती देवस्थानापैकी एक असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री येथे रविवार दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव, आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल, डोके हॉस्पिटल नारायणगाव, श्री हॉस्पिटल आळेफाटा, आरोग्य विभाग पंचायत समिती जुन्नर व ग्रामीण रुग्णालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 166 रुग्णांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, डॉ.अमेय डोके, डॉ. सचिन शिंदे, डॉ. तेजश्री जुनागडे व भरत भुजबळ यांच्या हस्ते सकाळी गणेश पुजन व दिप प्रज्वलन करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. देवस्थान ट्रस्टचे वतीने आलेल्या सर्व डॉक्टर, मान्यवर, वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल स्टाफ, नर्स व आशा सेविका यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. प्रकाश पाटील, डॉ. अमेय डोके, डॉ. सचिन शिंदे, डॉ.तेजश्री जुनागडे व डॉ. वर्षा गुंजाळ यांनी शिबिरास शुभेच्छा देत आलेल्या रुग्णांना विविध आजार व त्यावरील उपचारांबाबत मार्गदर्शन केले. शिबिर कार्यक्रमाचे सुत्र संचालन जितेंद्र बिडवई, प्रास्ताविक संजय ढेकणे व आभार प्रदर्शन शंकर ताम्हाणे यांनी केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोलीचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अक्षय जाधवर व स्टाफ, डोके हॉस्पिटलचे डॉ. अमेय डोके व स्टाफ, कॅन्सर सर्जन डॉ.तेजश्री जुनागडे, श्री हॉस्पिटलचे डॉ. सचिन शिंदे, डॉ. प्रकाश टाले,डॉ.शुभम कारंजकर, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. राजश्री सुर्यवंशी, संतोष शिंदे, विकास दुबे व स्टाफ, आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटलचे प्रकाश पाटील व स्टाफ, जुन्नर महालॅबचे प्रयोगशाळा समन्वयक मंगेश साळवे व स्टाफ, आशा वर्कस, देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सचिव शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवन हांडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, गोळेगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. आलेल्या सर्व रुग्णांना नाष्टाची व्यवस्था केली होती. तसेच शिबिरस्थळी जाण्याकरीता लेण्याद्री फाटा येथुन गाडीची व्यवस्था केली होती. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, रक्ताची तपासणी, इसीजी व हृदयरोग तपासणी, बालरोग तपासणी, स्त्री रोग तपासणी, त्वचारोग, मुत्ररोग तपासणी, कर्करोग (कॅन्सर), स्तनाचा कॅन्सर, नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, इत्यादी आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या. देवस्थानचेवतीने या शिबिरात आवश्यकतेनुसार रुग्नांना मोफत चष्मे वाटप व औषधे वाटप करण्यात आले. तसेच आयुष्यमान भारत या शासन योजनेचे कार्ड काढुन देण्यात आले. गरजु रुग्णांची मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबीरास विजय शिवराम ताम्हाणे यांच्यावतीने मोफत डोळ्याचे ड्रॉप देण्यात आले. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.