श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे अखंड हरिनाम सप्ताह.
अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री क्षेत्र लेण्याद्री येथे अखंड हरिनाम सप्ताह बुधवार दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४ रोजी पासून प्रारंभ झाले. पहाटे काकडा, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरीकिर्तन व नंतर हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यामध्ये ह भ प सुनिल महाराज पवार, ह भ प रोहीणीताई परांजपे – माने, ह भ प गोरक्षनाथ महाराज देठे, ह भ प जयश्रीताई तिकांडे, ह भ प गोविंद महाराज गोरे, ह भ प संतोष महाराज पायगुडे, ह भ प नामदेव महाराज वाळके, ह भ प पारस महाराज मुथ्था, ह भ प गणेश महाराज शिंदे यांची कीर्तन सेवा झाली. मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी ह भ प नामदेव महाराज वाळके यांचे सकाळी दहा वाजता मंदिरात श्री जन्माचे किर्तन झाले, बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी ह भ प गणेश महाराज शिंदे यांच्या कालाच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. सप्ताह काळात गोळेगाव, माळवाडी नेतवड, कुमशेत, शिवेचीवाडी, गोद्रे, उदापूर, गणेशवाडी भजनी मंडळे यांचे हरिजागर झाले.