श्री क्षेत्र लेण्याद्री येथे माघी श्री गणेश जयंतीनिमित्त बैलगाडा शर्यत.
मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे गोळेगाव ग्रामस्थांचेवतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यात पंचक्रोशीतील बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला दिवसभर बैलगाडे घाट चालु होता. याचा असंख्य बैलगाडा शौकीनांनी आंनद घेतला.