‘श्री क्षेत्र लेण्याद्रि’ येथील स्वागत कक्ष, व्ही.आय.पी. कक्ष व दर्शन मार्ग रेलींगचे उद्घाटन संसदरत्न खासदार डॉ. अमोलजी कोल्हे यांचे शुभहस्ते संपन्न.
गुरुवार दि. ११ जुलै २०२४ रोजी श्री लेण्याद्रि गणपती देवस्थान ट्रस्टच्या स्वागत कक्ष, व्ही.आय.पी कक्ष व दर्शन मार्गावरील रेलींगचे उद्घाटन शिरुर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. अमोलजी कोल्हे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
‘श्री क्षेत्र लेण्याद्रि देवस्थान’ हे अष्टविनायक तिर्थक्षेत्रापैकी एक तिर्थक्षेत्र असून याठिकाणी ‘श्री गिरिजात्मजाच्या’ दर्शनाकरिता देश-विदेशातून असंख्य भाविक व पर्यटक येत असतात. येथे येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांकरीता देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा सुविधा पुरविल्या जातात. त्यानुसार भाविकांकरीता देवस्थान ट्रस्टच्यावतीने स्वागत कक्ष व व्ही.आय.पी. कक्ष तयार करण्यात आला असुन दर्शन मार्गावर रेलींगचे काम चालु करण्यात आले आहे. याकामांचे उद्घाटन शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोलजी कोल्हे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी भारतीय पुरातत्व विभागाचे सहाय्यक संरक्षक बाबासाहेब जंगले, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौघुले, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष माऊलीशेठ खंडागळे, जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात, जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे, अंकुशशेठ आमले, मोहितभाऊ ढमाले, गुलाबशेठ पारखे, गोळेगाव सरपंच सुनिताताई मोधे, देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, कैलास लोखंडे, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने, देवस्थानचे कर्मचारी वर्ग, गोळेगाव ग्रामस्थ, भाविक भक्त व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवस्थानचे वतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. तसेच इतर उपस्थित मान्यवरांचा देवस्थानचे वतीने सत्कार करण्यात आला. देवस्थानचे वतीने भाविकांच्या विविध मागण्याबाबत व प्रस्तावित कामांबाबतचे निवेदन खासदार साहेब यांस देण्यात आले. तसेच भारतीय पुरातत्व विभागामार्फत भाविकांकडुन घेतले जाणारे प्रवेश शुल्क रद्द होणेबाबत व देव दर्शनाची वेळ वाढविणेबाबतची मागणी करण्यात आली. श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे भाविक व पर्यटक यांचेकरीता आवश्यक असलेल्या सोयी सुविधा करण्याचे आश्वासन खासदार साहेब यांनी आपले भाषणातून दिले. सदरचे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवस्थानचे विश्वस्त जितेंद्र बिडवई यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे यांनी केले व मान्यवरांचे आभार व समारोप देवस्थानचे सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी केले. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.