Skip to content
Home » On the occasion of Sankashti Chaturthi, a large crowd of devotees gathered to visit the Girijatmaja Ganapati at Shri Kshetra Lenyadri

श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रींचे दर्शनाकरीता भाविकांची गर्दी.

  • by

श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रींचे दर्शनाकरीता भाविकांची गर्दी.
शनिवार दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तिर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्रि (ता. जुन्नर) येथील ‘श्री गिरीजात्मज’ गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. श्री क्षेत्र लेण्याद्रि परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्ताने श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
श्री लेण्याद्रि गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे, जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गिरिजात्मज गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवाचे नैवेद्याकरीता दौंड येथील सरस्वती अष्टविनायक ग्रुप यांनी २५ किलो सफरचंद दिले. मंदिरात सकाळी ६ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. संकष्टी चतुर्थीनिमीत्त देवस्थानचे वतीने दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. भाविकांची व पर्यटकांची दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने, कर्मचारी व गोळेगाव ग्रामस्थ तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ, शिवेचीवाडी यांचे संगीत भजन झाले. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर पिंपळगाव सिद्धनाथ येथील सागर व नंदकुमार सुरेश डोके यांच्यावतीने भाविकांकरीता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.