Skip to content
Home » श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान येथे चपाती मशीनचे उद्घाटन

श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान येथे चपाती मशीनचे उद्घाटन

  • by

अष्टविनायक गणपती तीर्थक्षेत्रापैकी एक असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री येथे असंख्य भावीक व पर्यटक श्रींचे दर्शनासाठी येत असतात. आलेल्या भाविकांचे व पर्यटकांचे दर्शन सुलभ सुखकर व्हावे यासाठी देवस्थान ट्रस्ट प्रयत्न करत आहे. याकरीता देवस्थान ट्रस्टमार्फत आलेल्या भाविक व पर्यटकांकरीता विविध सेवा सुविधा पुरविल्या जातात तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवीले जातात. याच उपक्रमांतर्गत देवस्थान ट्र्स्टमार्फत आलेल्या भाविकांकरीता अल्पदरात अन्नछत्र चालविले जाते. या अन्नछत्रात पोटभर डाळ, भात, भाजी व शिरा हा महाप्रसाद दिला जातो. भाविकांचे मागणीनुसार देवस्थानचे विश्वस्त मंडळाने या महाप्रसादात चपाती देण्याचा विचार केला. याकरीता आवश्यक असलेल्या चपाती मशीनची मागणी देवस्थानने भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडीया यांचेकडे केली होती. देवस्थानने केलेल्या मागनीनुसार व भाविकांचे सेवेकरीता भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडीया यांच्यावतीने यांनी देवस्थानला सदरची चपाती मशीन भेट स्वरुपात देण्यात दिली. याच अनुषंगाने रविवार दिनांक ०१ जुन २०२५ रोजी सदर चपाती मशीनचे देवस्थानचे विश्वस्त गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, सचिव शंकर ताम्हाणे व भरत भुजबळ यांचे हस्ते विधीवत पुजाकरुन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे यांनी आलेल्या मान्यवर भाविकांचे तसेच भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडीया यांचे आभार आभार व्यक्त केले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सचिव शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे , विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने व कर्मचारी, गोळेगाव ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली