Skip to content
Home » १६ जानेवारी २०२६ ते शुक्रवार दि.२३ जानेवारी २०२६ अखंड हरिनाम सप्ताह

१६ जानेवारी २०२६ ते शुक्रवार दि.२३ जानेवारी २०२६ अखंड हरिनाम सप्ताह

  • by

श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे अखंड हरिनाम सप्ताह.
अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र लेण्याद्री येथे शुक्रवार दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०९.०० वाजता विणा पुजनाने अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला. दरम्यान पहाटे काकडा, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरीकिर्तन व नंतर हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये ह.भ.प. प्रियांकाताई साखरे, ह.भ.प. पोपट महाराज राक्षे, ह.भ.प. नेहाताई अर्जुन महाराज साळेकर, ह.भ.प. प्रभाकर महाराज कावले, ह.भ.प. भरत महाराज थोरात, ह.भ.प. कृष्णा महाराज कमानकर, ह.भ.प. नामदेव महाराज वाळके, ह.भ.प. दिनानाथ महाराज सावंत, ह.भ.प. श्रावण महाराज अहिरे यांची कीर्तन सेवा होणार आहे. गुरूवार दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे सकाळी दहा वाजता मंदिरात श्री गणेश जन्माचे किर्तन होणार असून शुक्रवार दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी ह.भ.प. श्रावण महाराज अहिरे यांच्या काल्याचे कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताह काळात गोळेगाव, माळवाडी नेतवड, कुमशेत, शिवेचीवाडी, गोद्रे, उदापूर, गणेशवाडी भजनी मंडळे यांचे हरिजागर होणार आहेत. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या ज्ञानामृताचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.