रविवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी देवस्थानचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. चतुर्थीनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय योजना करून मंदिर भाविकांकरिता दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.