Skip to content
Home » Wednesday, November 01, 2023, the Sankashti Chaturthi

बुधवार दि.०१ नोव्हेंबर २०२३ संकष्टी चतुर्थी

  • by
Girijatmaj Lenyadri Ganapati Ashtavinayak

बुधवार दि.०१ नोव्हेंबर २०२३ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील ‘श्री गिरीजात्मज’ गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्ताने श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष संजय ढेकणे, विश्वस्त सदाशिव ताम्हाणे, जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गिरिजात्मज गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरात सकाळी ६ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. तसेच भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या. भाविकांची व पर्यटकांची दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ शिवेचीवाडी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना देवस्थान ट्रस्टमार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच देवाचे नैवेद्याकरीता येणेरे येथील समीर तान्हाजी ढोले यांनी ५१ डझन केळी दिली. संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

Girijatmaj Lenyadri Ganapati Ashtavinayak