Skip to content
Home » Devasthan gets ISO certification.

देवस्थानास ISO मानांकन प्राप्त

  • by
Girijatmaj Lenyadri Ganapati Ashtavinayak Devstan

श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थानास ISO मानांकन प्राप्त.
सोमवार दि. 18 डिसेंबर 2023 रोजी अष्टविनायक गणपती तिर्थक्षेत्रापैकी एक असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थानास ISO मानांकन प्राप्त झाल्याची माहीती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान हे अष्टविनायक गणपती तिर्थक्षेत्रापैकी एक तिर्थक्षेत्र असुन याठिकाणी देश विदेशातुन असंख्य भाविक व पर्यटक श्री गिरीजात्मज गणपतीचे दर्शनाकरीता येथे येतात. श्री क्षेत्र लेण्याद्री येथे दिवसेंदिवस भाविकांचे व पर्यटकांचे संख्येत वाढ होत आहे. येथे येणार्‍या भाविकांना व पर्यटकांना श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टमार्फत विविध सेवा व सुविधा पुरविल्या जातात. तसेच भाविकांच्या व पर्यटकांच्या सेवेसाठी देवस्थान ट्रस्टमार्फत नेहमीच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. यातुन श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट भाविकांची व समाजातील विविध घटकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. याकरीता देवस्थानास विविध प्रमाणपत्रे व मानांकने प्राप्त आहेत. देवस्थानास यापुर्वी ISO मानांकन प्राप्त होते. परंतु डिसेंबर 2023 मध्ये सदरचे मानांकनाची मुदत संपल्याने पुन्हा देवस्थान ट्रस्टचे ISO ऑडीट करुन देवस्थानास नव्याने ISO मानांकन प्राप्त झाले. त्याची मुदत सण 2023 ते 2026 पर्यंत आहे. सदरचे प्रमाणपत्र सोमवार दि.18 डिसेंबर 2023 रोजी देवस्थानास प्राप्त झाले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्थ प्रभाकर गडदे, ISO ऑडीटर लक्ष्मीकांत साधु उपस्थित होते. अशी माहीती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

Girijatmaj Lenyadri Ganapati Ashtavinayak Devstan