माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान येथे चालु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात शुक्रवार दि.09 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 07.00 ते 09.00 वाजेपर्यंत तिसर्या दिवसाची किर्तनसेवा ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज देठे यांची संपन्न झाली. त्यांनी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे ‘वैष्णवां संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥’ या चार चरणाचे अभंगावर आपले सुंदर सुश्रव्य वाणीतून निरुपण केले. याचा सर्व भाविक भक्तांनी श्रवण लाभ घेतला.