Skip to content
Home » अखंड हरिनाम सप्ताह : आठवा दिवस

अखंड हरिनाम सप्ताह : आठवा दिवस

  • by

अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान येथे माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त चालु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याची किर्तनसेवा बुधवार दि.14 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 1०.०० ते 12.3० वाजेपर्यंत ह.भ.प. गणेश महाराज शिंदे यांची संपन्न झाली. त्यांनी आपले सुंदर सुश्रव्य वाणीतून जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे ‘हरीने माझे हरिले चित्त। भार वित्त विसरले॥’ या चार चरणाचे गौळणपर अभंगावर निरुपण केले. त्याचा सर्व भाविक भक्तांनी श्रवण लाभ घेतला. या काल्याचे किर्तनाने चालु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.