Skip to content
Home » भव्य महाआरोग्य शिबिर – २०२६

भव्य महाआरोग्य शिबिर – २०२६

  • by

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, गोळेगाव; मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणे आणि डिसेंट फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि.२० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० यावेळेत यात्री निवास भाग नं.२, श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, गोळेगाव ता.जुन्नर, जि.पुणे येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात होणार्‍या तपासण्या व उपचार

  • मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया
  • हृदयरोग, कर्करोग व इतर सर्व आजारांची तपासणी
  • अस्थिरोग, दंत, कान-नाक-घसा व त्वचारोग तपासणी
  • मोफत औषधोपचार व आवश्यक शस्त्रक्रिया
  • आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी
  • गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्र व दिव्यांग साहित्य वाटप पूर्व तपासणी .

रुग्णांनी आधारकार्ड, रेशनकार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) सोबत आवश्य आणावे.
या भव्य महाआरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी आवश्य लाभ घ्या…!
हा संदेश जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवा.
आपला छोटासा सहभाग, कोणाला तरी नवे जीवन देऊ शकतो !

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन

सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा वसा पुढे नेत ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या गरजू रुग्णांना योग्य व मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळावा, या उदात्त हेतूने श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, गोळेगाव यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणे आणि डिसेंट फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये सर्व रोगांची मोफत तपासणी, विविध आजारांवरील उपचार तसेच आवश्यक शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सदर शिबिर श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या यात्रीनिवास, भाग क्रमांक २, गोळेगाव, ता. जुन्नर, जि. पुणे येथे शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत होणार आहे.

या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. डॉ. अमोलजी कोल्हे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणेचे अध्यक्ष मा. डॉ. मानसिंग साबळे उपस्थित राहणार आहेत.

तसेच या शिबिरास जुन्नर तालुक्याचे आमदार मा. शरददादा सोनवणे, माजी आमदार मा. अतुलशेठ बेनके आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. सत्यशीलदादा शेरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शिबिरामध्ये उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधा

या शिबिरामध्ये खालील वैद्यकीय सेवा व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

    • मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया.

    • हृदयरोग व मधुमेह तपासणी.

    • कर्करोगाची पूर्वतपासणी व जनजागृती.

    • हाडांचे व सांधेदुखीच्या आजारांची तपासणी.

    • कान, नाक व घसा (ईएनटी) तपासणी.

    • दंत तपासणी.

    • बालरोग व त्वचारोग तपासणी.

    • रक्तदाब (बी.पी.), रक्तातील साखर (शुगर) व रक्ताशी संबंधित विविध तपासण्या.

    • आयुर्वेदिक उपचार व व्यायामविषयक मार्गदर्शन.

    • मोफत औषधांचे व चष्म्यांचे वाटप.

    • गरजेनुसार विविध शस्त्रक्रियांची सुविधा.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा

या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान वय वंदना योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी नावनोंदणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच गरजू नागरिकांना मोफत श्रवणयंत्र मिळण्यासाठी पूर्वतपासणी व नावनोंदणीची सुविधा उपलब्ध असेल.

दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यापूर्वी तपासणी व नावनोंदणी करण्यात येणार असून, त्यासाठी खालील साहित्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

    • व्हीलचेअर

    • तीनचाकी सायकल

    • वॉकर

    • चालण्याच्या काठ्या

    • कृत्रिम हात-पाय

    • कुबड्या

    • कॅलिपर

या शिबिरासाठी विविध नामांकित रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये व आरोग्य संस्थांचे सहकार्य लाभणार असून, पुणे व जुन्नर परिसरातील अनेक वैद्यकीय संस्था सहभागी होणार आहेत.

तरी सर्व नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, महिला-भगिनींनी तसेच गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

रुग्णांच्या ने-आण करण्यासाठी लेण्याद्री फाटा येथून वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.