Skip to content
Home » अखंड हरिनाम सप्ताह : पाचवा दिवस

अखंड हरिनाम सप्ताह : पाचवा दिवस

  • by

अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान येथे माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त चालु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील पाचव्या दिवसाची किर्तनसेवा रविवार दि.11 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 07.00 ते 09.00 वाजेपर्यंत ह.भ.प. गोविंद महाराज गोरे यांची संपन्न झाली. त्यांनी आपले सुंदर सुश्रव्य वाणीतून जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे ‘जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥’ या चार चरणाचे अभंगावर निरुपण केले. त्याचा सर्व भाविक भक्तांनी श्रवण लाभ घेतला.