Skip to content
Home » अखंड हरिनाम सप्ताह : सातवा दिवस

अखंड हरिनाम सप्ताह : सातवा दिवस

  • by

अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान येथे माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त चालु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील सातव्या दिवसाची किर्तनसेवा मंगळवार दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री ०7.०० ते ०9.०० वाजेपर्यंत ह.भ.प. पारस महाराज मुथ्था यांची संपन्न झाली. त्यांनी आपले सुंदर सुश्रव्य वाणीतून श्री संत नामदेव महाराज यांचे ‘हेची देवा पै मागतो।चरण सेवा अखंडित॥’ या चार चरणाचे मागणीपर अभंगावर निरुपण केले. त्याचा सर्व भाविक भक्तांनी श्रवण लाभ घेतला.