Skip to content
Home » कोरोनाचे वाढते प्रादुर्भावामुळे संकष्टी चतुर्थीस श्री क्षेत्र लेण्याद्रि बंद

कोरोनाचे वाढते प्रादुर्भावामुळे संकष्टी चतुर्थीस श्री क्षेत्र लेण्याद्रि बंद

  • by

कोरोनाचे वाढते प्रादुर्भावामुळे संकष्टी चतुर्थीस श्री क्षेत्र लेण्याद्रि बंद .

रविवार दिनांक २७ जुन २०२१ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी देवस्थानचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर नागरिकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मंदिर बंद असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शन घेतले. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी चतुर्थीनिमित्त श्री गिरीजात्मजास साकडे घालण्यात आले. कोरोनाच्या आजारामुळे व लॉकडाउन निर्बंध चालू असल्याने मंदिरे व धार्मिक स्थळे बंद आहे. परंतु मान्सुनचे आगमनामुळे व निसर्ग सौंदर्यामुळे इतर जिल्हातील पर्यटकांची वरदळ पुणे जिल्हात वाढली आहे. मंदिर बंद असले तरी रविवारचे सुट्टीमुळे दिवसभरात अहमदनगर, नाशिक, ठाणे व इतर ठिकाणांवरुन अनेक भाविकांनी श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे येवुन पहिल्या पायरीचे दर्शन घेतले. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.