या शिबिराची विशेष बाब म्हणजे दुष्काळजन्य परिस्थितीत मदतकार्यासाठी श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रुपये १,११,१११/- (अक्षरी रुपये एक लाख अकरा हजार एकशे अकरा फक्त) इतक्या रकमेचा धनादेश डॉ.मानसिंग साबळे यांच्याकडे प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. मानसिंग साबळे, डॉ.अश्विनी कुळमेथे यांनी शिबिरास शुभेच्छा देत आलेल्या रुग्णांना विविध आजार व त्यावरील उपचारांबाबत मार्गदर्शन केले तसेच आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित करून देवस्थान ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
शिबिरास आलेल्या मान्यवराचे तसेच सहभागी हॉस्पिटल व संस्थांचे स्वागत देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र बिडवई यांनी केले तर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.संजय ढेकणे यांनी शिबिराचे प्रास्ताविकातून देवस्थान ट्रस्टच्या धार्मिक, सामाजिक व आरोग्यविषयक कार्याचा आढावा दिला तसेच धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करणे ही देवस्थान ट्रस्टची सामाजिक बांधिलकी असून त्याच भावनेतून हा निधी देण्यात आल्याचे प्रास्ताविकात स्पष्ट करण्यात आले.
देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी शिबिरास आलेल्या मान्यवरांचे तसेच सहभागी हॉस्पिटल व संस्थांचे आभार प्रदर्शन केले.
यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. सत्यशीलदादा शेरकर, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणेचे अध्यक्ष मा.डॉ. मानसिंग साबळे, जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी कुळमेथे, जेष्ठ नागरिक संघ तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. डोंगरे सर, जुन्नर नगरपालिकेचे माजी नगरसेवक मा.भाऊ कुंभार, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे,उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉ.एफ.बी.आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, डॉ.दयानंद गायकवाड, विविध रुग्णालयांचे डॉक्टर्स व वैद्यकीय अधिकारी तसेच मोट्या संख्येने जुन्नर तालुक्यातील ग्रामस्थ व रुग्ण उपस्थित होते.
या शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आरोग्य सुविधा
-
-
मोफत नेत्र तपासणी
-
-
-
मोतीबिंदू शस्त्रक्रिया
-
-
-
हृदयरोग व मूत्ररोग तपासणी
-
-
-
कर्करोग पूर्वतपासणी व जनजागृती
-
-
-
हाडांचे व सांध्यांचे आजार
-
-
-
मेंदू व मणक्याचे आजार
-
-
-
कान-नाक-घसा तपासणी
-
-
-
दंत तपासणी
-
-
-
बालरोग
-
-
-
त्वचारोग
-
-
-
बी.पी. व शुगर तपासणी
-
याशिवाय आयुर्वेदिक उपचार, व्यायाम मार्गदर्शन, आवश्यकतेनुसार रुग्णांना मोफत चष्मे व औषध वाटप, गरजू रुग्णांना श्रवणयंत्र वाटप तसेच दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी तपासणी व नोंदणीची सुविधा करण्यात आली.
७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान वय वंदना योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य उपचार सुविधेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व मोफत नावनोंदणीची सुविधा करण्यात आली होती.
या उपक्रमात विविध नामांकित रुग्णालये, वैद्यकीय संस्था, तज्ञ डॉक्टर्स व सेवाभावी संस्थांनी सहभाग घेतला.
अशी माहीती देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.
मराठी
English
