श्री क्षेत्र लेण्याद्री येथे अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रींचे दर्शनाकरीता भाविकांची गर्दी.
मंगळवार दि.२९ सप्टेंबर २०२६ रोजी अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तिर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील ‘श्री गिरीजात्मज’ गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. भाद्रपद महिन्यातील अंगारक संकष्टी चतुर्थी आल्याने व या चतुर्थीला विशेष महत्व असल्याने दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्ताने ‘श्री गिरिजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ०६.१५ वाजता देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे, विश्वस्त सदाशिव ताम्हाणे व कैलास लोखंडे यांच्या हस्ते श्रींचा विधीवत अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यानिमित्त ‘श्री गिरिजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवाचे नैवेद्याकरीता गोळेगाव येथील कैलास लक्ष्मण लोखंडे यांनी १ कॅरेट पेरु, गोळेगाव येथील सचिन सदाशिव ताम्हाणे यांनी २ कॅरेट पपई, नारायणगाव येथील संजय महादेव बनकर, दौंड येथील सरस्वती अष्टविनायक ग्रुप, गोळेगाव येथील संदेश उत्तम लोखंडे व महेश अशोक सरजिने यांनी प्रत्येकी २ कॅरेट केळी तसेच कुमशेत येथील अंकुश जालिंदर डोके यांनी १ कॅरेट केळी प्रसाद दिला. मंदिरात सकाळी ७ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली. अंगारक संकष्टी चतुर्थीनिमीत्त देवस्थानचे वतीने दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. तसेच यानिमित्ताने वै.ह.भ.प. लक्ष्मण केरु भोसले यांच्या स्मरणार्थ वारकरी संप्रदाय यांजकडून भाविक भक्तांकरीता खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अंगारक संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व असल्याने दिवसभर भाविकांची व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविक व पर्यटकांचे देव दर्शन सुलभ व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले होते. तसेच यानिमित्ताने देवस्थान ट्रस्ट व शिवनेरी ब्लड सेंटर यांचे संयुक्त विदयमानाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने, कर्मचारी व गोळेगाव ग्रामस्थ तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ, शिवेचीवाडी यांचे संगीत भजन झाले. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर नारायणगाव येथील सखाराम पारधी, जुन्नर येथील रामदास सखाराम ताजणे, जुन्नर येथील निखिल चंद्रकांत गोंगे, श्रीगोंदा येथील गणेश विजयकुमार ननवरे, पिंपळे गुरव येथील रविंद्र हनुमंत सावंत, नाशिक येथील योगेश भास्करराव धारणकर यांच्यावतीने भाविकांकरीता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री गिरीजात्मज गणेशाच्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक, जुन्नर व आजुबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक श्री गिरीजात्मज गणेशाच्या दर्शनासाठी येत होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

मराठी
English
